Home संगमनेर संगमनेरात वाकचौरेंचा पुतळा भर चौकात उलटा लटकवला

संगमनेरात वाकचौरेंचा पुतळा भर चौकात उलटा लटकवला

Sangamner News: वाकचौरे यांचा प्रतीकात्मक पुतळा भर चौकात उलटा लटकावत त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला.

statue of Bhausaheb Wakchaure was hung upside down in Chowk in Sangamner

संगमनेर: माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याने संगमनेर शहरातील काही शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.  शहरातील भर चौकात वाकचौरे यांचा प्रतीकात्मक पुतळा लटकावत काही कार्यकर्त्यांनी वाकचौरे यांचा निषेध जाहीर केला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून त्यावेळी खासदार रामदास आठवले यांचा पराभव केला होता. नंतरच्या काळात वाकचौरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरची निवडणूक त्यांनी काँग्रेस कडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. वाकचौरे पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. यासाठी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  वाकचौरे यांनी शिवसेनेसोबत त्यावेळी गद्दारी केली होती त्यामुळे त्यांना आता शिवसेनेत घेऊ नये अशी भावना काही कार्यकर्त्यांची आहे.

संगमनेर येथील अज्ञात कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा भर चौकात उलटा लटकावत त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला आहे. शिवसेनेचे काही कार्यकर्ते वाकचौरे यांच्या प्रवेशाला अनुकूल असताना दुसर्‍या एका गटाने मात्र विरोध दर्शवला आहे. शिवसेना प्रवेशाचा एक प्रकारे निषेध जाहीर केला आहे.

Web Title: statue of Bhausaheb Wakchaure was hung upside down in Chowk in Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here