Home अहमदनगर सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

State level award of de-addiction council to Somnath Gite

पुणे | संगमनेर : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोमनाथ गिते (Somnath Gite) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अंजली पाटील यांनी दिली आहे. सोमनाथ गिते यांनी सामाजिक कार्य म्हणून गेल्या काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करत आहेत.

नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. मुक्ता टिळक, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे.

व्यसनमुक्ती परीषद ही राज्यात व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच सदन व्यक्ती, विषयतज्ञ, व्यसनमुक्ती सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समुपदेशक यांचा गौरव व यांच्या कार्याला गती मिळून व्यसनमुक्ती चळवळ बळकट व्हावी या उद्देशाने हे पुरस्कार दिले जात असल्याची माहिती व्यसनमुक्ती परिषदेचे सचिव प्रा. अजिनाथ शेरकर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यावर दिली. ही निवड व्यसनमुक्ती परिषदेच्या निवड समितीचे प्रमुख व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. विजय पवार, डॉ. राजकुमार गवळे, सचिव प्रा. आजिनाथ शेरकर यांच्यासह सात तज्ञ सदस्यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिम यादीची मुंबईत घोषणा केली आहे.

Web Title: State level award of de-addiction council to Somnath Gite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here