खळबळजनक: Murder: एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या
बुलढाणा (चिखली): बुलढाणा आगारात एक २५ वर्षीय घटस्फोटीत तरुणी कार्यरत असलेल्या अंत्री खेडेकर शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरुणीच्या गळ्यावर व शरीरावर धारधार शस्त्राने वाऱ केलेले व अंगावर चटके दिलेल्या खुणा आढळून आल्या आहेत.
त्यामुळे तिचा खून झाला असल्याचे व्यक्त केले हात आहे. माधुरी भीमराव मोरे वय २४ रा. अंत्री खेडकर असे या मयत तरुणीचे नाव आहे. बुलढाणा बस आगारात त्या कार्यशील होत्या. १५ एप्रीलला कामकाज संपल्यानंतर आठवडी सुट्टी असल्याने अंत्री खेडेकरला परतणार होत्या. मात्र रात्री त्या घरी पोहोचल्या नाही.
१६ एप्रिल रोजी अंत्री खेडकर शिवारात सकाळी वाकसाठी गेलेल्या नागरिकांना मृतदेह आढळून आला. याबाबत अंढेरा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असता तरुणीचा गळा चिरलेला व शरीरावर शस्त्राने वार केल्याचे व चटके दिल्याच्या खुणा मृतदेहावर आढळून आल्या आहेत.
ओम प्रॉडक्शन आपल्याकरिता कोरोना जनजागृती एक नवीन उर्जा देणारे गीत: खालील युट्युब लिंकवर क्लिक करून पहा: कोरोना गीत
PLEASE LIKE — SUBSCRIBE —– SHARE
Web Title: ST carrier murder young woman