Accident, संगमनेर: एसटी बस-पिकअपचा अपघात
घारगाव |संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्यानजीक (जुन्नर) गुरुवारी (24 मार्च) सकाळी साडेनऊच्या सुमारास एसटी बस आणि मालवाहतूक पीकअपला झालेल्या अपघातात (Accident) आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकहून पुण्याकडे जाणारी एस टी बस (क्रमांक एम.एच 14 बी टी 4079) व आळेफाटा बाजूने संगमनेरकडे जाणारी मालवाहू पिकअप (क्रमांक एम एच 48 बी. एम. 6014) यांचेत आळेफाट्याजवळील शुभम तारांगण सोसायटी समोर विचित्र अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
या अपघातात पिकअप टेम्पो चालक सुरज सरदार (वय 25 रा. डहाणू) याचेसह एस टी बसमधील प्रवाशी सिमा नरेश भूसे ( वय 50, रा. नाशिक), बाळासाहेब दिगंबर घोडेकर (वय 67, रा. समशेरपूर ता. अकोले), बबन कुमार पटेल (वय 33, पुणे मुळ रा. बिहार), तुकाराम भागुजी डोंगरे (वय 72, रा. अकलापूर, ता. संगमनेर), दत्तात्रय बाबुराव गिते (वय 35, रा. सिन्नर नाशिक), अवि मुल्लाह (वय 26) व तकदीर मुल्लाह (वय 70 दोघेही रा. नाशिक) यांचेसह वाहक हे जखमी झाले. तर पिकअप चालक सुरज हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
दरम्यान अपघात (Accident) घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले असून पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.
Web Title: ST bus-pickup accident