संगमनेर: विवाहितेचा विनयभंग; आरोपीला २ वर्षे शिक्षा
Breaking News | Sangamner Crime: विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा.
संगमनेर : विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. येथील फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांनी गुरुवारी (दि.२५) हा निकाल दिला.
२००९ मधील ही घटना आहे, त्यावेळी पीडित विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिल साबळे याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील म्हणून राहुल शेळके यांनी काम पाहिले. एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी आणि तपासी अंमलदार तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक जाधव यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी साबळे याला ठोठावलेली ५० हजार रुपये द्रव्यदंडाची रक्कम पीडित विवाहितेला देण्याबाबत न्यायालयाने आदेश केला आहे.
Web Title: Spousal molestation Accused sentenced to 2 years
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study