Home Accident News भरधाव ट्रक गतिरोधकावरून उडाला अन्‌ थेट घरात घुसून झाला पलटी

भरधाव ट्रक गतिरोधकावरून उडाला अन्‌ थेट घरात घुसून झाला पलटी

Latur News: कापसाची वाहतूक करणारी ट्रक गतिरोधकावरून जम्प घेऊन एका घरात घुसून पलटी होऊन अपघात (Accident)  झाल्याची घटना.

speeding truck flew over the barrier and rammed straight into the house and overturned Accident

लातूर : लातूरहून अंबाजोगाईकडे भरधाव वेगात जात असणाऱ्या कापसाची वाहतूक करणारी ट्रक गतिरोधकावरून जम्प घेऊन एका घरात घुसून पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई हायवेवर लातूर शहरालगत असलेल्या बोरवटी पाटीवर येथे हा अपघात घडला. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.

लातूर– अंबाजोगाई मार्गावर झालेल्‍या या अपघातात ट्रक कर्नाटकच्या गफूर येथून कापूस घेऊन बीड जिल्ह्यातील केज येथे जात असताना अंबाजोगाई हायवेवर लातूर शहरालगत असणाऱ्या बोरवटी पाटीवरील गतिरोधकावर ट्रक जम्प झाला. त्यामुळे ट्रक चालक असिफ याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रोडलगत असलेल्या एका घरात घुसला आणि पलटी झाला.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र घराची भिंत पडून आणि ट्रकचे सुमारे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: speeding truck flew over the barrier and rammed straight into the house and overturned Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here