भरधाव टेम्पोने तीन महिलांना चिरडलं, भीषण अपघातात दोघींचा मृत्यू
Breaking News | Accident: भरधाव आलेल्या टेम्पोने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू. (Two Died)
रायगड : कर्जत – नेरळ मार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत. आता असाच एक मोठा भीषण अपघात या मार्गावर झाला आहे. भरधाव आलेल्या टेम्पोने तीन जणांचा जीव घेतला आहे. कर्जत – नेरळच्या दिशेने पायी जाणाऱ्या जैन साध्वीसह सेवेकरी महिलांना एका वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी आणि सेवेकरी लता ओसवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक सेवेकरी जखमी झाली आहे.
काल १९ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी आणि इतर सेवेकरी असे १२ जणी कर्जतवरून नेरळकडे पायी चालल्या होत्या. त्यावेळी नेरळकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका दूध वाहून नेणाऱ्या टेम्पोने त्यांना मागून जबरदस्त धडक दिली. यात साध्वी मौलिक पुराणश्रीजी व लता संदीप ओसवाल यांचा मृत्यू झाला. तर दीपाली संजय ओसवाल या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलिसांनी तात्काळ आरोपी व अपघात करणाऱ्या टेम्पोचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेऊन त्याला तळोजा येथून ताब्यात घेतले असल्याचे समजते. घटनेनंतर जैन समाजाने कर्जत, नेरळ, खोपोली भागातील आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अपघात करून पळ काढणाऱ्या टेम्पो चालकाचे नाव रविशंकर सेन (वय ४०) असे असून हे वाहन तुर्भे येथील असल्याची माहिती मिळत आहे. अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करत आहेत.
Web Title: Speeding tempo crushes three women, two die in horrific accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study