विराट कोहलीवर कोसळला दुःखाचा डोंगर: जवळच्या व्यक्तीचं निधन
Virat Kohali: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचे निधन झाले आहे. लहान असताना क्रिकेटचे धडे देणारा प्रशिक्षक गमविल्याने विराट कोहलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी बत्रा यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सुरेश बत्रा यांनी विराट कोहलीला लहानपणी प्रशिक्षण दिले. गुरुवारी त्यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी पूजा करत असताना अचानक कोसळले ते पुन्हा उठू शकले नाही असं लोकपल्ली यांनी म्हंटले आहे.
बत्रा यांच्या निधनाने लहान भाऊ गमाविल्याची भावना कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले. राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा हे १९८५ पासून एकमेकांना ओळखतात.
विराट कोहलीच्या फलंदाजी पैलूत व फलंदाज घडविण्यात राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांचा मोठा वाटा आहे.
विराट कोहली सुरेश बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या नवव्या वर्षापासून प्रशिक्षण घेऊ लागला. त्यांनी विराट सोबतच आणखी खेळाडू घडविले. मनज्योत कालरा यांना देखील बत्रा यांनीच प्रशिक्षण दिले आहे. कालराणे १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात शतक झळकावल. भारतीय संघाच्या विजयात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
Web Title: Sorrow fell on Virat Kohli