Home अकोले अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली

अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली

Akole PSI Abhay Parmaar Transferd

अहमदनगर: अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्यातून अहमदनगर कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी प्रभारी पदी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या कालवधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडे हे पकडल्याची घटना नुकतीच घडली आहे. तसेच लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश राहिला नाही. काही अवैध धंदे सुरूच असल्याने वादग्रस्त ठरल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबत अधीक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी आदेश काढला आहे.

अलीकडेच पोलीस नाईक संदीप पांडे यास ५ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले होते. पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने परमार यांना जबाबदार धरून बदलीचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना काढवा लागला. त्यांच्या जागी प्रभारी पदी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आला आहे.  

Web Title: Akole PSI Abhay Parmar Transferd to ahmednagar Control Center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here