Home महाराष्ट्र Accident:  भाविकांवर काळाचा घाला; ट्रक व कारचा भीषण अपघात, पाच जण ठार

Accident:  भाविकांवर काळाचा घाला; ट्रक व कारचा भीषण अपघात, पाच जण ठार

Solapur Five killed in truck-car crash Accident

सोलापूर | Solapur: मिरज येथून पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नऊ जण चारचाकीतून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. चालकाला डुलकी लागल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर उभ्या असलेल्या  ट्रकला चारचाकीने मागून जोरात धडक दिल्याने अपघात (accident)  झाला.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात  उपचार सुरु आहेत.

हुबळी येथील शितोळे कुटुंबीय मिरज येथील नातेवाईक जाधव यांच्या मिरजेतील घरी गेले होते. रात्री ९ जण इनोव्हा गाडीतून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते दुपारच्या सुमारास अक्कलकोटला निघाले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आली.

दुपारच्या सुमारास महामार्गावर वाहनेही कमी होती. यामुळे इनोव्हा चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. बाजार समिती दीडशे मीटर अंतरावर असतानाच अलिकडे महामार्गावर एका बाजूला थांबलेल्या ट्रकला इनोव्हाने मागून जोरात धडक दिली. या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक तातडीने तेथे दाखल झाले. पोलिसही काही वेळात त्याठिकाणी आले आणि त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत.

Web Title: Solapur Five killed in truck-car crash Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here