Home अमरावती सोशियल मेडीयातून ओळख, नंतर आक्षेपार्ह चित्रफित काढून तरुणीवर अत्याचार

सोशियल मेडीयातून ओळख, नंतर आक्षेपार्ह चित्रफित काढून तरुणीवर अत्याचार

Amravati Crime: अकोल्यातील तरुणासोबत सोशियल मेडीयातून ओळख, रोशनने तरुणीला भेटीसाठी बोलावले,‎ तरुणी भेटायला गेल्यानंतर त्याने तरुणीला‎ शरीरसुखाची मागणी, शेतात तिच्यावर बलात्कार (Rape).

social media, then Rape the girl by making an offensive video

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका‎ तरुणीची अकोल्यातील तरुणासोबत सोशियल मेडीयातून ओळख झाली. यातूनच‎ त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. दरम्यान, तरुणाने‎ पीडित तरुणीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून तिला‎ शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर तरुणीवर‎ बलात्कार केला.

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून‎ पोलिसांनी अकोल्याच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.‎ रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) असे‎ गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रोशन व‎ पीडित तरुणी यांची समाज माध्यमावर ओळख‎ झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्‍या ९‎ एप्रिलला रोशनने तरुणीला भेटीसाठी बोलावले,‎ तरुणी भेटायला गेल्यानंतर त्याने तरुणीला‎ शरीरसुखाची मागणी केली. तिने त्यासाठी नकार‎ दिला तर त्याने बळजबरीने तरुणीची आक्षेपार्ह‎ चित्रफीत तयार केली.

त्यानंतर ११ एप्रिलला पीडित‎ तरुणी पुन्हा रोशनला भेटण्यासाठी अकोला येथे‎ गेली. त्यावेळी एका शेतात तिच्यावर बलात्कार‎ केला. त्यावेळीसुद्धा त्याने अश्लील छायाचित्र व‎ चित्रफीत काढली असावी, असा संशय पीडितेला‎ आहे.

दरम्यान, तरुणीने त्या तरुणाला लग्नाबाबत‎ विचारणा केली असता, त्याने नकार दिल्याचेही पीडितेने‎ पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.‎ दरम्यान, या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी‎ तरुणाविरुद्ध बलात्कारचा गुन्हा‎ दाखल केला आहे.

Web Title: social media, then Rape the girl by making an offensive video

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here