संगमनेर: चेक बाऊन्सप्रकरणी एकास सहा महिने कारावास
Breaking News | Sangamner: उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वटल्याप्रकरणी दाखल खटल्यामध्ये येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड याला सहा महिने साध्या कारावासह तक्रारदाराला ३.३८ लाख २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.
संगमनेर: उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वटल्याप्रकरणी दाखल खटल्यामध्ये येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड याला सहा महिने साध्या कारावासह तक्रारदाराला ३.३८ लाख २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे.
शहरात समीर महाले यांचे दागिन्यांचे दुकान आहे. संदीप आव्हाड व तक्रारदार समीर महाले यांच्या ओळखीतून आव्हाड याने जुलै २०१७ मध्ये ५० ग्रॅम सोन साखळी ९.३२० मिली सोन्याची अंगठी असे १.६९ लाख १३० रुपये किमतीचे दागिने तीन महिने मुदतीवर उधार घेतले होते.
महाले यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आव्हाड याने संगमनेर शाखेचा बंधन बँकेचा १.६९ लाख १३० रुपयांचा चेक तक्रारदाराला दिला होता. तक्रारदार फिर्यादी समीर महाले यांनी चेक बैंक खात्यात भरला असता, रकम अपुरी असल्याने तो परत आला. ही वाच महाले यांनी आव्हाड याला सांगितल्यानंतर त्याने दौड महिन्यानंतर बैंक पुन्हा बँकेत भरण्यास सांगितले, मात्र पुन्हा चेक न वटल्याची माहिती आरोपीला दिली, परंतू पैसे न मिळाल्याने महाले यांनी आव्हाड याला अॅड. पी. एस. कोल्हे यांच्यामार्फत नोटीस पाठवून चेकच्या रकमेनी मागणी केली तरी देखील आव्हाड याने रक्कम दिल्ली नाही. यामुळे आव्हाड विरोधात संगमनेर न्यायालयात चेक बाऊन्स
प्रकरणी खटला दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एच. दाभाडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती, तोंडी विधानाखेरीज कोणतेही कागदपत्रे दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने बचावाचा मुद्दा फेटाळला न्यायदंडाधिकारी ही. एच. दाभाडे यांनी आव्हाड वाला दोषी ठरविले.
Web Title: Six months imprisonment for one in check bounce case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study