Accident: कंटेनर-कार अपघातात सहा जण जखमी
Ahmednagar | पारनेर | Parner: नगर पुणे महामार्गावर सुपा पवारवाडी येथे कंटेनर कार अपघातात (Accident) सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर महामार्गावरच कंडेनर आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना पुणे – अहमदनगर महामार्गावर पवारवाडी येथे घडली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात मुरलीधर गणपत कानडे , बन्सी दादाराम उबाळे, गंगाराम बाबुराव कादे, दिलीप फडतरे, हरिदास उबाळे व कंटेनरचालक महमंद सुलेमान हे जखमी झाले आहेत.
याबाबत हरिदास प्रल्हाद उबाळे (रा. भेंडाटाकळी ता.गेवराई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री ते स्विप्ट कार (क्र. एमएच 24 – एडी 630) या कारने पुण्याच्या दिशेने जात असताना सुपा पवारवाडी येथे कंडेनर चालक महम्द सुलेमान यानी कंटेनर क्रमांक (एमएच 46 एच 5879) हा कंटेनर बेजबादार पणे चालवत रोड दुभाजकावर धडकुन कारला धडक दिली.
या गाडीतील पाच व कंटेनर चालक असे सहा जण जखमी झाले. आपघाताची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पी आय श्री गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संदीप पवार, खंडेराव शिंदे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सुपा पोलिसांनी ऐकेरी वाहतूक चालू करून वाहनांची गर्दी कमी केली. सुपा पोलिसांनी महमद सुलेमान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पी .आय गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
Web Title: Six injured in container-car accident