शिर्डी: सहा हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका, ११ पुरुषांना ताब्यात
Ahmednagar News: सहा हॉटेलवर छापा (Raid) टाकून अनैतिक अवैध व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीच्या हॉटेलवरून ११ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका करण्यात आली आहे.
शिर्डी: येथील ६ हॉटेलवर छापा टाकून अनैतिक अवैध व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीच्या हॉटेलवरून ११ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली असून या घटनेमुळे शिडीत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत शिर्डीत काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक अवैध व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री आठ वाजले दरम्यान अतिशय बारकाईने सापळा रचून शिर्डीत अनैतिक अवैध व्यवसाय सुरू असणाऱ्या सहा हॉटेलवर छापा टाकून त्या ठिकाणी ११ पुरुषांना ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची सुटका केली.
शिर्डी पोलिसांनी सुरू केलेले या मोहिमेची बातमी सर्वत्र समजता अनेक हॉटेलवर अशा प्रकारे सुरू असलेल्या व्यवसाय धारकांचे धाबे दणाणले. अशा प्रकारचा व्यवसाय करत असणाऱ्यांनी ही बातमी समजतात त्यांनी आपले हॉटेल बंद केले. शिर्डीत एकाच वेळी आशा प्रकारच्या अवैध अनैतिक व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संदीप मिटके यांनी अत्यंत हुशारीने शुक्रवारी रात्री शिर्डी शहरात ही मोहीम राबवल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. परंतु शिर्डी पोलीस मात्र या सुरू असलेल्या व्यवसायांकडे दुर्लक्ष का करते या मागचे कोडे आहे. शिर्डी शहरात शुक्रवारी जवळपास सहा हॉटेलवर छापा टाकण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी अनैतिक अवैध व्यवसाय करणारे हॉटेल चालक व यात सामील असणाऱ्या इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग व्यवसाय आहे. दैनंदिन शिर्डीत मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेऊन शिर्डीत अनेक हॉटेल व लॉजिंग मध्ये सर्रासपणे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो. स्थानिक पोलिसांना याची माहिती असताना देखील पोलीस या व्यवसाय करणाऱ्यांवर कुठलेही प्रकारची कारवाई करत नाही.
परिणामी अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल अधिक वाढते शुक्रवारी रात्री संदीप मिटके यांनी कुठल्याही दबावाला न घाबरता धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या हॉटेलवर छापा टाकून कडक कारवाई केली. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते.
Web Title: Six hotels raid, 15 girls rescued, 11 men detained
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App