संगमनेर तालुक्यात विजेच्या धक्क्याने सहा गायींचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे निमोण रस्त्यागत गायींच्या गोठ्यावर उच्च दाबाची वीज प्रवाही तार तुटून पडल्याने दोन शेतकऱ्यांच्या तीन तीन असे सहा गायींचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक परिसरात रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. निमोण रस्त्यालगत फकीरा राधु गडाख व दत्तू फकीरा गडाख यांच्या गोठया शेजारील एक विजेची तार तुटून पडली. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत उतरला यावेळी दोघांच्या तीन व तीन असे सहा गायी त्या ठिकाणी बांधलेल्या असल्यामुळे विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. पशुवैद्यकीय डॉक्टर पानसरे यांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. शासनाच्या वतीने त्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: Six cows die due to electric shock in Sangamner