बहिणीच्या प्रियकराला दारु पाजून रेल्वे ट्रॅकवर फेकले, दोन्ही पाय कापल्याने…..
Amravati Crime: बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिल्याची घटना.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या राजना रोडवरील रेल्वे ट्रॅकवर सोमवारी (5 जून) मध्यरात्रीच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापल्याने बहिणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक केली तर एका आरोपीचा शोध सुरु आहे.
अजय पुंडलिकराव ठोंबरे (वय 27 वर्षे) असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर रोहन वासुदेव यादव (वय 22 वर्ष), गणेश बाबाराव मोरे (वय 23 वर्ष) आणि धनंजय उर्फ सोनू विजय बाबर (वय 24 वर्ष) (सर्व रा. शिवाजी नगर, चांदूर रेल्वे) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी रोहन यादव हा आरोपी पसार झाला आहे.
जखमी अजय ठोंबरे याचे एका आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. परंतु हे प्रेमसंबंध आरोपीला मान्य नव्हते. याचा राग मनात धरुन त्या आरोपीने इतर दोन आरोपींसोबत संगणमत करुन अजय ठोंबरले शिवाजी पार्क, चांदूर रेल्वे इथे बोलावून दारु पाजली आणि त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यानंतर अजय ठोंबरे हा बेशुद्ध झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या रेल्वे रुळावर फेकले. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या अजयचे गुडघ्याखालील पाय रेल्वेमुळे कापल्याने तो गंभीर जखमी झाला.
चांदूर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली आणि वेगाने तपास चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासात आरोपी गणेश मोरे आणि धनंजय उर्फ सोनू बाबर या दोघांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्याच्या कबुली दिली आणि संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितली. तर याची तिसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: Sister’s boyfriend was thrown on the railway track
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App