सर्वोदय कनिष्ठ महाविदयालयातील प्रा. विनोद तारु यांची रक्तदानाची सिल्व्हर जुबली

अकोले: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.विनोद तारू यांनी रक्तदान शिबिरात रक्तदानाची “सिल्व्हर जुबली” साजरी केली. यामुळे तालुक्यातून विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. सत्यानिकेतन संस्थेचे सचिव मा. टी. एन. कानवडे, सह-सचिव मिलिंद उमराणी, प्राचार्य एम. डी. लेंडे, पर्यवेक्षक एस.ए. नरसाळे एस.एस. पाबळकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री नवोदय प्रतिष्ठान, पुणे व शिवण्या मल्टिपल अकॅडमी, अकोले आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नुकतेच मा. वसंत मनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सर्वोदय कनिष्ठ महाविदयालयातील प्रा. विनोद तारु यांनी रक्तदानाची “सिल्व्हर जुबली ” साजरी केली. त्यांनी आतापर्यंत 24 वेळा रक्तदान केले होते. आणि शतक करण्याचा त्यांचा मानस आहे. याप्रसंगी अकॅडमीचे डायरेक्टर विष्णु पिलाने यांनी त्यांचा “कोरोना योद्धा”म्हणुन प्रमाणपत्र, शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुनम कदम, विशाल पगारे, युसुफ शाह, दिपक जाधव, अमोल आरोटे, राजु कांबळे आदी उपस्थित होते. आधार ब्लड बँक, पुणे यांच्या मदतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले.
Web Title: Silver Jubilee of Vinod Taru’s Blood Donation

















































