Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर येथील गोंधवनी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी असलेल्या महिला साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या (Suicide) केली आहे. विजया सदाशिव जगताप असे या महिलेचे नाव आहे.
या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला. मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यांनी गोंधवाणी रोड येथील कॉन्स्टेबल पवार यांना माहिती दिली.
Web Title: Shrirampur Woman commits suicide in lake