रिक्षा व दुचाकीच्या अपघातात, रिक्षाचालक ठार
श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर येथील नेवासा रस्त्यावर प्रवासी रिक्षा व दुचाकीत अपघात घडला. या अपघातात रिक्षा चालक मृत्यूमुखी झाला आहे. तर प्रवासी महिला जखमी झाली आहे.
हरेगाव येथून रिक्षा प्रवाशी शहरात मोकाट जनावरांना वाचविण्यासाठी दुचाकीस्वार आणि रिक्षा समोरसमोर आल्याने अपघात घडल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार हा दुचाकी घेऊन फरार झाला आहे. या अपघातात गयाबाई चंद्रभान खाजेकर वय ७० या वृद्ध महिला जखमी झाल्या आहेत. तर शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजेकर यांच्यावर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीस्वराचा शोध सुरु असल्याचा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मोकाट असलेल्या जनावरांना वाचविताना रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Shrirampur Rickshaw driver killed in rickshaw and two-wheeler accident