Home अहमदनगर प्रांत अधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले  

प्रांत अधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले  

Shrigonda personal assistant was caught red-handed taking a bribe

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंद्याचे उपविभागीय महसूल अधिकारी सुधाकर भोसले यांच्या स्वीय सहायकाला तीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी श्रीगोंदा तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकऱ्याला चुकीचा फेरफार रद्द करण्यासाठी स्वीय सहायक शैला राजेंद्र झांबरे यांनी तीन हजारांची लाच मागितल्याने ही कारवाई केली गेली आहे.

उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले हे गुरुवारी दावे प्रतीदावे सुनावणीसाठी श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात येत असतात. त्यांच्या सोबत स्वीय सहायक शैला झांबरे या देखील आल्या होत्या. शैला झांबरे यांनी एका शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यातील तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे दिनकर पिंगळे यांनी केली आहे.  

Web Title: Shrigonda personal assistant was caught red-handed taking a bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here