Shrigonda: ट्रक दुचाकीच्या अपघातात चार युवक ठार
श्रीगोंदा | Shrigonda: ट्रक व दुचाकीच्या अपघातात चार युवक ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली. नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारात पवारवाडीजवळ हा अपघात घडला. उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रकला टक्कर बसून हा अपघात घडला.
राजकुमार विठ्ठल पवार वय १७, प्रतिक नर्सिंग शिंदे वय १६, विशाल संतोष सोनवणे वय १६, राहुल बाजीराव बरकडे सर्व रा. लोणी व्यंकनाथ शिवारात पवारवाडी ता. श्रीगोंदा अशी या मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
बुधवारी सकाळी हे चार मीटर एकाच दुचाकीवरून पोहण्यासाठी गावात चाललेले होते. त्यावेळी एक ट्रक्टर उस घेऊन जात असताना ट्रक्टरला ओव्हरटेक करीत असताना समोरून नगरकडून आलेला ट्रक आणि यांची दुचाकी यांच्या धडक बसली. यामध्ये तिघे जण जागीच ठार झाले तर प्रतिक शिंदे याला उपचारासाठी दौंड येथे नेत असताना मृत्यू झाला. ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. ट्रक चालक हा रा. बेलवंडी खुर्द ता., पाटण जि. सातारा येथील आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: Shrigonda Four youths killed in a truck-bike accident