सुनेवर अत्याचार करणारा सासरा अटकेत
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदे तालुक्यातील माठ येथे सासऱ्यांने सुनेवर अतिप्रसंग केला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सासू सासऱ्यासह नणंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सासऱ्याने १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सून घरात एकटी असताना याचाच फायदा घेत सुनेशी लगट करत अतिप्रसंग केला. प्रतिकार केला असता तू ओरडू नकोस तुझा आवाज ऐकून कोणीही येणार नाही असे म्हणत अत्याचार केला.
तसेच कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारीन असे सांगून तो निघून गेला. सून त्याच्या धमकीला घाबरल्याने तिने कोणासही काही सांगितले नाही.
नंतर १६ फेब्रुवारी रोजी सदर प्रकार नवरा, सासू आणि नणंद यांस सांगितला मात्र त्यांनीही कोणाला सांगू नकोस आमची इज्जत घालवू नकोस तुलाच आणखी त्रास होईल असे सांगत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.
पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक संपतराव जाधव यांनी सासरयाला मध्यरात्रीच अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे हे करत आहे.
Web Title: Shrigonda Father-in-law arrested for abusing