Home श्रीगोंदा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २७ लाखांच्या बोटी जप्त, दोघांवर गुन्हा

अवैध वाळू उपसा करणाऱ्या २७ लाखांच्या बोटी जप्त, दोघांवर गुन्हा

Shrigonda Boats worth Rs 27 lakh seized for illegal sand extraction

श्रीगोंदा | Shrigonda: गौण खनिजांची विना परवाना उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा असल्याने तसेच वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाने नसताना अवैध वाळू उपसा प्रकार हा भीमा नदी पात्रात सुरु असल्याने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कडक कारवाई केली आहे.

कौठा शिवारातील भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या २७ लाख रुपये किमतीच्या तीन फायबर बोटी व तीन सेक्शन पंप जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केली.

याप्रकरणी बाबुराव राजू पाटोळे रा. दौंड जि. पुणे व सोनू व्यंकटेश बाल्याळ रा. शालीमार चौक ता. दौंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाबुराव राजू पाटोळे यांच्या दोन बोटी तर सोनू व्यंकटेश बाल्याळ यांच्या एक बोटीचा समावेश आहे.

कौठा नदी शिवारात भीमा नदी पात्रात तीन बोटी अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना समजली. त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

Web Title: Shrigonda Boats worth Rs 27 lakh seized for illegal sand extraction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here