खळबळजनक: ६० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील पुई फाट्याजवळ हॉटेलच्या वेटरकडून ६० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना सोमवार १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यात पुई फाट्याजवळ एका हॉटेल शेजारी राहणारी महिला सपरासमोर बाज टाकून झोपलेली असताना हॉटेल मधील वेटर मद्यपान करून तिच्याजवळ गेला. त्याने झोपलेल्या महिलेचे तोंड दाबले. तोंड दाबल्याने त्या महिलेला जाग आली असता प्रतिकार केला मात्र तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
पिडीत महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी आरोपीचा शोध घेत हॉटेलमध्ये तो आरोपी आढळून आला मात्र अंधारचा फायदा घेत तो तेथून पळून गेला. या पिडीत महिला व नातेवाईक यांनी वेटर विरोधात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Shrigonda Attempted rape of a 60-year-old woman