अहमदनगर भीषण अपघात: कार ट्रेलरवर धडकून तिघा मित्रांचा मृत्यू
Ahmednagar | Shrigonda Accident | श्रीगोंदा: मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला कारची पाठीमागून जोराची धडक बसल्याने भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रोगोंदा येथील हॉटेल अनन्यासमोर रविवारी रात्री एक वाजता हा अपघात घडला.
राहुल सुरेश आळेकर वय २२ रा. श्रीगोंदा, केशव सायकर वय २२ रा. काष्टी आणि आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस वय १८ रा. श्रीगोंदा या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
आकाश आणि राहुल हे केशव सायकराला सोडविण्यासाठी काष्टी ला जात असताना अपघात घडला. या तिघांचा अपघात झाल्याने श्रीगोंद्यात शोककळा पसरली आहे.
Web Title: Shrigonda Accident Three friends killed in car crash