दुकानाला लागलेल्या आगीत ३० लाखांचा माल खाक
काष्टी | Shrigonda: शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जायभाय कॉम्प्लेक्स मधील तुळशी जनरल स्टोअरला आग लागून यात सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तरी पोलिसांच्या गस्त पथकामुळे मोठे नुकसानटळले.
शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तुलशी जनरल स्टोअरला आग लागली. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित हे गस्ती पथकासह चालले असताना त्यांनी ही आग पाहिली.तत्काळ त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली. त्यांनी नगराध्यक्ष यांना फोन केला आणि नगरपालिका अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तसेच साखर कारखान्याची अग्निशामन गाडी बोलाविण्यात आली. दोनही अग्नीशामन च्या जवानांनी तीन तासांत आग आटोक्यात आणली. शेजारीच या कॉम्पेक्स मध्ये बँक, एटीएम. शेती भांडार फोटो स्टुडीओ अशी दुकाने होती. आग विझाविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनास्थळास बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी भेट दिली.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Shrigonda 30 lakh worth of goods destroyed in a shop fire