अकोले: जागेच्या वादातून राजूरमधील विद्यालयाची तोडफोड
अकोले: जागेच्या वादातून राजूरमधील विद्यालयाची तोडफोड
अकोले: रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अरुण माळवे, आकाश माळवे, व अन्य दोघांनी राजूर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर प्रवेश करून शाळेच्या आवारात व परिसरात जेसीबी मशीन चा वापर करून प्रवेशद्वार, आवाराची म्हींत पाडून जमिनीत खोदकाम करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना घडली. यासंदर्भात तक्रार श्री स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी सोमवारी सकाळी राजूर पोलीस ठाण्यात दाखल केली. पूर्वीपासून असलेल्या वादामुळे संगमनेर न्यायालयात दावा दाखल केला असून त्यावर जैसे थी परिस्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असताना या शाळेचे प्रवेश्दवार व आवाराची भिंत वरील इसमांनी जेसीपी च्या मदतीने व काही ठिकाणी हाताने उद्वस्त करून त्यात शाळेची वीज, पाणी व आवारातील वृक्षारोपण करण्यात आलेली १०० झाडे उद्वस्त करून जमीनदोस्त केल्याची तक्रार शांताराम काळे यांनी राजूर पोलिसांकडे केली आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
यासंदर्भात माहिती देताना शांताराम काळे यांनी सांगितले की, १५ वर्षापासून हे विद्यालय आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहे. हि शाळेची जागा जमीन मालकांनी दोन लाख रुपयांना दिली होती. पण ३६ गुंठे जागा मात्र वेळोवेळी पैसे वाढवून व जागेचे पाच लाख रुपये घेतले आहेत. एकूण जमिनीचे २४ लाख रुपये दिले आहेत. आज ग्रामपंचायत असलेल्या नोंदी नेत्यांना हाताशी धरून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्याविरोधात संगमनेर न्यायालयात दावा दाखल होऊन त्यावर स्टे मिळाला आहे. पण काल रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अरुण माळवे, ग्रामपंचायत सदस्य गौरव माळवे, नंदू माळवे, आकाश माळवे,व अन्य दोघांनी हे शाळेचे गेट, कंपाउंड , भिंत जेसीपी च्या साह्याने व हाताने उध्वस्त केली.
शाळेचे प्रवेशद्वार, आवार व भिंतीचे नुकसान केल्याने या शाळेतील विद्यार्थी व मुलीना डुकरांचा त्रास होऊ शकतो. शेजारच्या गटारातील पाणी शाळेत आल्यावर दुर्घंधी पसरली तर डास वाढतील त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्याय मिळाला नाही तर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक व संस्था चालकानी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
Website Title: shri swami samarth vidyalay rajur school collapse
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: