Home महाराष्ट्र Rape | धक्कादायक! नराधम भाच्याने केला मामीवर बलात्कार

Rape | धक्कादायक! नराधम भाच्याने केला मामीवर बलात्कार

Shocking Naradham's nephew rape his aunt

लातूर | Latur: दारुच्या नशेत मामीवर भाच्याने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा येथे समोर आली आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तासातच या आरोपीला पोलिसांनी  अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील औसा शहरात मामीवर भाच्याने दारूच्या नशेत बलात्कार केला. पिडीत महिला औसा शहरात धुणी भांड्याचे काम करते. या २८ वर्षीय विवाहितेवर तिच्याच भाच्याने दारूच्या नशेत जबरदस्ती करून  बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

२८ वर्षीय पीडित महिला ही शहरात आपल्या कुटुंबासोबत राहते. काल पीडिता आपल्या घरी काम करत होती. यादरम्यान तिचा नराधम भाच्याने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला आहे. तर याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली होती.

याबाबत २८ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करत आहेत.

Web Title: Shocking Naradham’s nephew rape his aunt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here