सिन्नर: शिवशाही चालकाची बसमध्येच आत्महत्या
सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नाशिक: सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चालकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राजू ठुबे (रा.दोनवाडे, विंचुरदळवी) असे चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराची शिवशाही बस शिर्डीकडून सिन्नरकडे जात असताना वावी, पांगरी येथील शिंदे वस्तीजवळ बसमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी दुपारी एक वाजेपासून उभी होती. रात्री बस दुरुस्त करण्यासाठी आलेल्या सिन्नर आगाराच्या पथकास बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने राष्ट्रीय महामार्ग गस्ती पथकाचे प्रमुख श्रेयस हुबळीकर,पर्यवेक्षक प्रशांत शिंदे, रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे यांच्या मदतीने पोलिसांना पाचारण केले.
Web Title: Shivshahi driver committed suicide in the bus
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App