Home Accident News शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, १ ठार तर १२ जखमी

शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, १ ठार तर १२ जखमी

Nashik News: ट्रक आणि लक्झरी बस मध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या घटनेत एक ठार तर जवळपास १० ते १२ जण जखमी.

Shirdi-bound pilgrims bus accident, 1 killed and 12 injured

नाशिक: शुक्रवारी नाशिक मुंबई महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि लक्झरी बस मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत एक ठार तर जवळपास १० ते १२ जण जखमी असल्याची माहिती समोर आली  आहे. ही बस मुंबईहून शिर्डीला दर्शनाशाठी चाललेल्या भाविकांची होती या बसचा ६.३० वाजेच्या सुमारास महामार्गावर असलेल्या बोरटेंभे येथे अपघात झाला. . देवदर्शनासाठी शिर्डी येथे जात असताना रस्त्यातच दुर्दैवी प्रसंग घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर आज पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक MH 04 FJ 3803) ला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्सरी बस (क्रमांक MH 48 K 3718) ने जोरदार धडक दिली यात एक जण ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घोटी टोलच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

नाशिक मुंबई महामार्गावर बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोन लावण्यात आले होते. यादरम्यान मुंबईहून शिर्डी कडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ज्वेल फिश ट्रॅव्हल्स खाजगी कंपनीची बस असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. बस चालकाला पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली, यावेळी ना दुरुस्त ट्रकचा चालक मेहमूद शेख हा ट्रकच्या मागे काम करत होता. ट्रकला जोरदार धडक बसल्याने चालक जागीच ठार झाला. तर बसचा चालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून मधील आणखी काही १० ते ११ जण जखमी झाले आहेत.

पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला असून अपघातातील जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काही रुग्णांना इगतपुरी तालुक्यातीलच विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Web Title: Shirdi-bound pilgrims bus accident, 1 killed and 12 injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here