लॉजवर पोलिसांची कारवाई, दोन महिलांची सुटका, तिघे अटकेत
शेवगाव: शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील एका लॉजवर सुरु असलेल्या देह विक्री व्यवसायावर अनगर येथील अनैतिक मानवी व्यापार शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
छाप्यात मिळून आलेल्या महिलांना पुणे येथील महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. सेवाभावी संस्थेचे संदेश किसन जोगेराव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिन रुपचंद मुसावत रा. शेवगाव, संदीप माणिक शेळके रा. नेवासा रस्ता, अमर अश्पाक शेख रा. पिंगेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे/ त्यांच्याकडून ८३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील सागर लॉजवरील कुंटनखाण्यात लहान मुली व महिलांकडून देहविक्री व्यवसाय घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रीडम फर्म या संस्थेला मिळाली होती. त्यांनी शेवगाव येथील पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे यांना ही माहिती दिली. त्यानंतर नगर येथील पथक व स्थानिक पोलीस पथकाने सापळा रचत समाजसेवी मालोजी सूर्यवंशी यांना बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या सात नोटा असे साडे तीन हजार रुपये दिले. सर्व सुचना देऊन आतमध्ये खातरजमा करण्यासाठी पाठविले याठिकाणी व्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच सूर्यवंशी यांनी पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्यासह पथकाने छापा टाकून महिलाना ताब्यात घेतले तर तिघांना अटक केली.
Web Title: Shevgaon Police action on the lodge