Home शेवगाव शेवगाव शहरातील करोनाबाधित महिलेचा मृत्यू

शेवगाव शहरातील करोनाबाधित महिलेचा मृत्यू

Shevgaon one corona infected death

शेवगाव(Shevgaon): शेवगाव शहरातील एका ५८ वर्षीय करोनाबाधित महिलेचा अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे तहसीलदार अर्चना पागीरे यांनी दिली. 

सदर महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात २७ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान बुधवारी तीन जणांचा करोना अहवालपॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७० झाली आहे, सध्या १८ जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ५१ रुग्णांनी करोनातून बरे झाले आहे.  

शेवगाव शहर व ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एक हजार चाचणी कीटस तालुका प्रशासनाकडे उपलब्ध आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shevgaon one corona infected death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here