शिर नसलेले मृतदेह हत्याकांड रहस्य उलगडले, या कारणासाठी केला गेला खून
शेवगाव: शेवगाव पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडले आहे. याप्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पैसे व दागिन्यांच्या मोहातून आजी नातवाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
शहरातील आयटीआय जवळील इदगाह मैदानात रविवारी अज्ञात महिलेचे मुंडके नसलेले धड आढळून आले होते. तसेच एका मुलाचा मृतदेह मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याकामी सुचना दिल्या होत्या.
पोलिसांनी शेवगाव पाथर्डी येथे विविध ठिकाणी संभंधित महिला व मुलाच्या संदर्भात चौकशी केली. याचवेळी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात मयत मुलगा व त्यांच्यासोबत एक इसम फिरत असल्याचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते. त्यांनतर तपासाची चक्रे अधिक गतिमान करत औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथून मेकपालसिंग पोटीयासिंग चितोडिया यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केलिया असता खुनाची कबुली दिली आहे.
या तपासात मृत महिलेच्या जवळील चांदीचे दागिने व पैशासाठी या दोघ्नाचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून कमलाबाई कागडीसिंग चितोडिया वय ७० व सुनील बिट्टासिंग चितोडिया वय १० असे मयत आजी नातवाचे नावे आहेत.
Web Title: Shevgaon headless corpse murder mystery unfolded