Home अहमदनगर शेवगाव गोळीबार; एकाचा मृत्यू

शेवगाव गोळीबार; एकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: गोळीबार प्रकरणात शेवगाव पोलिस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून सराईत गुन्हेगार पिन्या कापसेविरोधात गुन्हा दाखल.

Shevgaon Firing death of one

शेवगाव : येथील शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी (दि. ३) दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात शेवगाव पोलिस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून सराईत गुन्हेगार पिन्या कापसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी युवकाचा सोमवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, अर्जुन संजय पवार (रा. पुसद, जि. यवतमाळ), असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजेश गणेश राठोड (२८, पुसद, जि. यवतमाळ) याने शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली.

अन्वर (पूर्ण नाव नाही) नावाच्या व्यक्तीने फोन केल्याने अर्जुन पवार व राजेश राठोड हे दोघे गुरुवारी (दि. २९ फेब्रुवारी) शेवगावला आले. त्याने पाथर्डीजवळील एका शेडमध्ये त्यांना सोडले. तेथे चौघे मुक्कामी राहिले. शुक्रवारी (दि. १ मार्च) संदीप मच्छिंद्र पवार याने मोबाइलमधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून, त्याला संपवायचे आहे, असे सांगितले होते. शनिवारी (दि. २) मार्च सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला. दोन पिस्टल व तीन कोयते दाखवून स्वतःजवळ ठेवले. त्यांनतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून शेवगाव येथे गेले. कापसे न सापडल्याने पुन्हा पाथर्डीला परतले. रविवारी (दि. ३ मार्च) संदीप व अन्वर हे पाथर्डीला आले. यातील संदीप याने एक पिस्टल गणेश तर दूसरे डीके (दोघांचेही पूर्ण नाव नाही) याच्याकडे दिले, त्यानंतर पिन्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंतीगृह येथे बसलेला असल्याचे सांगितले. ते सर्व जण दोन दुचाकींवरून तेथे पोहोचले. दुपारी दीडच्या सुमारास डीके याने पिस्टलमधून फायरचा प्रयत्न केला.

तसेच गणेश यानेही त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले. परंतु, ते पिन्या कापसे याला लागलेच नाहीत. त्यांनतर सर्वजण तेथून जात असताना पिन्याने एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

Web Title: Shevgaon Firing death of one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here