Home क्राईम मेहुणीच्या मुलीवर ९ वर्षे लैंगिक अत्याचार

मेहुणीच्या मुलीवर ९ वर्षे लैंगिक अत्याचार

मेहुणीच्या मुलीवर तब्बल ९ वर्षे लैंगिक अत्याचार (sexually abused), मावशीसह दोघांना अटक : तिसऱ्याची सुधारगृहात रवानगी.

Sexually abused of sister-in-law's daughter for 9 years

मुंबई: मेहुणीच्या मुलीवर तब्बल ९ वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात त्याच्या दोन मुलांचाही सहभाग आहे. त्यानुसार बाप-लेकांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही विरारच्या बरफपाडा परिसरात, तर तिची मावशी बोरिवलीच्या गणपत पाटीलनगरमध्ये पती व दोन मुलांसह राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या मावशीकडे २०१४ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राहण्यासाठी आली होती. त्यादरम्यान वेळोवेळी तिच्यावर तिन्ही आरोपींनी बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. तिने ११ फेब्रुवारी रोजी विरार पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा प्रकार एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला, त्यामुळे विरार पोलिसांनी तो झिरो झिरोवर वर्ग केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Web Title: Sexually abused of sister-in-law’s daughter for 9 years

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here