मुलीचे आंघोळीचे निर्वस्त्र फोटो काढून धमकी देत सहा महिने अत्याचार
Parner Crime News: निर्वस्त्र छायाचित्रे नातेवाईकांना तसेच समाज माध्यमांवर पाठवण्याची धमकी देत सहा महिने अत्याचार (Sexually abused).
पारनेर: अल्पवयीन मुलीला धमकावत सहा महिने सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात बाललैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप छबन चत्तर (सिध्देश्वरवाडी, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या घराजवळ राहणाऱ्या आरोपीने, माझ्या नकळत मी अंघोळ करीत असतानाची छायाचित्रे काढली. आपली निर्वस्त्र छायाचित्रे नातेवाईकांना तसेच समाज माध्यमांवर पाठवण्याची धमकी देत सहा महिने आपल्यावर अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. छायाचित्रांचा वापर धमकावण्यासाठी करून आपल्यावर आरोपीने सिध्देश्वरवाडी तसेच पारनेर येथील लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे करीत आहेत.
Web Title: Sexually abused for six months by threatening to take nude photos of the girl