जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लोणी | Loni: येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूरच्या रेल्वे कॉलनीत राहणारा मोहन उर्फ सनी प्रसन्ना लोंढे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (sexually abuse) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.
आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे अमिष दाखवून तसेच पळून जाऊ नये म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध (sexual assault) प्रस्थापित केले.. सदर घटना लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लोणी पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ सनी प्रसन्ना लोंढे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि समाधान पाटील यांनी दिली.
Web Title: Sexually abuse a minor girl by threatening to kill her