Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गरोदर असल्याने घटना उघडकीस  

संगमनेर: अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गरोदर असल्याने घटना उघडकीस  

Sangamner: नातेवाईकांतील अल्पवयीन मुलाने स्वतः च्या घरात 10 सप्टेंबर 2021 ते 24 जुन 2022 या कालावधीत शाररिक संबध. (Sexual relations)

Sexual relations with a minor girl, pregnancy

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरातून  धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वेळोवेळी शाररिक संबंध प्रस्थापित केल्याने अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे माहिती समोर आल्याने ही घटना उघडकीस आली आहे.  

सदर घटना जवळे कडलग परिसरातील आरोपीच्या घरात 10 सप्टेंबर 2021 ते 24 जुन 2022 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जवळेकडलग परिसरात एक कुटुंब राहत आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा असे छोटे कुटुंब आहे. त्यांचा शेतमजुरीवर उदरनिर्वाह चालतो. पिडीत अल्पवयीन मुलगी 13 वर्षाची असल्याने ती एका शाळेत इयत्ता 8 वी इयत्तेत शिकत आहे. मोठ्या मुलीचे लग्न असल्याने पिडीत अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपासून शाळेत न जाता घरीच होती. मात्र, दि. 6 ऑगस्ट 2022 रोजी पिडीत मुलीचे वडील सकाळी 8:30 वाजता शेताला कोंबडखत घेण्यासाठी निमगावजाळी येथे गेले होते. ते घराच्या बाहेर पडताच पिडीत अल्पवयीन मुलीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास चक्कर आली. त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने तिला रुग्णालयात नेले. पिडीत अल्पवयीन मुलीला डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी रुग्णवाहिकेद्वारे पुढील तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवले, पिडीत अल्पवयीन मुलीला तपासले असता ती गरोदर असल्याचे समोर आले.

पिडीत मुलीला याबाबत वडिलांनी विचारले असता जवळे कडलग परिसरातील नातेवाईकांतील अल्पवयीन मुलाने स्वतः च्या घरात 10 सप्टेंबर 2021 ते 24 जुन 2022 या कालावधीत शाररिक संबध ठेवल्याचे समोर आले. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sexual relations with a minor girl, pregnancy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here