धक्कादायक! महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार
Breaking News | Crime: लग्नाचे प्रलोभन दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर वारंवार बलात्कार.
छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे प्रलोभन दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सिडको पोलिसांनी संशयित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब गवळी असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी डॉक्टर आणि पीडिता छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होते. कालांतराने दोघांमध्ये मैत्र झाली. हळुहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यावेळी लग्नाचे प्रलोभन दाखवून आरोपी बाळासाहेब याने पीडितेसोबत जवळीक साधली.
यानंतर पीडितेला शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये नेलं. तिथे पीडितेला दारू पाजून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. जेव्हा पीडितेला शुद्ध आली तेव्हा आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने डॉक्टरकडे विचारणा केली असता, काही होत नाही. मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असं प्रलोभन आरोपीने पीडितेला दिलं.
यानंतरही डॉक्टरने अनेकदा पीडित महिलेवर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने डॉक्टरकडे लग्नाची विचारणा केली. तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं कळताच पीडितेने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सिडको पोलिसांनी आरोपी बाळासाहेब गवळी याच्यावर गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भातील अधिकचा तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sexual assault on female doctor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study