अहमदनगर ब्रेकिंग: मुळा धरणावर सुरक्षा रक्षकाची स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या
Rahuri Suicide News: सुरक्षा रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना.
राहुरी: राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील रहिवाशी पोलीस कर्मचारी भाऊसाहेब दगडू आघाव (वय ५०) हे नगर येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांना मुळा धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आलं होत. त्यांनी आज सकाळी स्वत:वर बंदूकीने गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने झाडलेली गोळी ही तोंडावरील हनुवटीपासून वर डोक्यातून बाहेर आल्याचे समजते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Web Title: security guard committed suicide by shooting himself at Mula Dam