Home अहिल्यानगर अहिल्यानगर: स्कॉर्पिओ वाहन हॉटेलमध्ये घुसले; महिला ठार

अहिल्यानगर: स्कॉर्पिओ वाहन हॉटेलमध्ये घुसले; महिला ठार

Breaking News | Ahilyanagar Accident: गाडी हॉटेल व जनरल स्टोअर्समध्ये घुसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.

Scorpio vehicle rams into hotel woman killed

कोपरगाव : मुंबई-नागपूर महामार्गावरील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली जीप (एमएच १२ एनझेड ००५७) गाडी हॉटेल व जनरल स्टोअर्समध्ये घुसली. या अपघातात सुनंदा साबळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले आहेत. घटनेत सुनंदा साबळे (वय ५६) यांचा मृत्यू तर सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय अलका वसंत साबळे हे दोनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. कोपरगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर मार्गावरील एस.जे.एस. हॉस्पिटल जवळील साई जनार्दन हॉटेल व एका जनरल स्टोअर्समध्ये भरधाव येणारी स्कॉर्पिओ गाडी घुसली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी  आपला  अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

हॉटेलचालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या अपघाताची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. गाडी स्टॉलमध्ये घुसताच मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. स्कॉर्पिओ चालकाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली. नंतर त्याचे नियंत्रण सुटले व तो हॉटेल व जनरल स्टोअर्समध्ये घुसला.

Web Title: Scorpio vehicle rams into hotel woman killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here