Home नाशिक सत्यजित तांबे यांची कॉंग्रेस नेत्यांवर खरमरीत टीका, ते म्हणतात कॉंग्रेसचे सर्व….

सत्यजित तांबे यांची कॉंग्रेस नेत्यांवर खरमरीत टीका, ते म्हणतात कॉंग्रेसचे सर्व….

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe माझ्या बाजूने कोणीही उभं नाही, असे कोण म्हणत, सर्वपक्षीय कार्यकर्ते माझ्यासोबत.

Satyajeet Tambe's harsh criticism of Congress leaders

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार झाला आहे. काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यासाठी आलेल्या सत्यजीत तांबे यांनी निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी सत्यजीत तांबे सोमवारी नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी नाकारणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर खरमरीत शब्दांत टीका केली. माझ्या बाजूने कोणीही उभं नाही, असे कोण म्हणत आहे?  नाशिकमधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. इकडे पक्ष वगैरे काही नाही. अगदी शिवसेनेचे कार्यकर्तेही माझ्यासोबत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना ग्राऊंडवरची परिस्थिती काय आहे, ते माहिती नाही, हे माझे स्पष्ट मत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, मुंबई दिल्लीत बसलेल्या लोकांना ग्राउंड परिस्थिती माहित नाही.  ग्राऊंडवरील लोकं प्रेमाने आमच्याबरोबर जोडलेली आहे. निवडणूक जिंकणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाणे संपर्क करणे आणि त्यांचा प्रश्न समजून घेणे आणि त्यांचा असलेला ऋणानुबंध व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते माझ्यासोबत असून या ठिकाणी एक पक्ष नाहीत, तर शिवसेना, भाजप काँग्रेस सगळे आहेत. यावर आता काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Web Title: Satyajeet Tambe’s harsh criticism of Congress leaders

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here