अपक्ष फॉर्म बाबत सत्यजीत तांबेंचा मोठा खुलासा
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; अपक्ष अर्ज का भरला याबाबत सत्यजित तांबे यांचा मोठा खुलासा समोर आला आहे. तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला.
नाशिक: नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत पुत्र सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितलं. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली होती. त्याचवेळी पक्षाकडून सत्यजीत यांच्या नावाचा एबी फॉर्म न आल्यामुळे सत्यजीत अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
या अपक्ष अर्ज दाखल भरण्यावर सत्यजीत तांबेंनी खुलासा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, ‘मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता, पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला’ असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं आहे.
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज अखेर अपक्ष अर्ज का भरला याचा पहिल्यांदाच खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सगळ्या लोकांचा मला पाठिंबा असून सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझा फॉर्म अपक्ष भरावा लागला, असं सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे.
Web Title: Satyajeet Tambe’s big revelation about independent form
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App