तांबेंवर गंभीर आरोप, निवडणुकीच्या प्रचारावेळी पैठणी अन् पैसे वाटले
Nashik Graduate Constituency Election Satyajeet Tambe: सत्यजित यांनी प्रचारावेळी पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप नाशिक पदवीधर अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबेंवर केले.
नाशिक: विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागणार आहे. यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नाशिक पदवीधर निवडणुकीचाही निकाल हाती येत आहे. या निकालावेळीच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सत्यजित यांनी प्रचारावेळी पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप नाशिक पदवीधर अपक्ष उमेदवार सुभाष जंगले (Subhash Jangale) यांनी सत्यजित तांबेंवर केले आहेत.
नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबेंवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीचा प्रचार करताना सत्यजित तांबेंनी महिलांना पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप जंगले यांनी केला आहे.
सुभाष जंगले बोलताना म्हणाले की, नाशिक पदवीधरची निवडणूक प्रचंड चुरशीची आहे. या निवणुकीची राज्यसह देशभर चर्चा रंगली. तुम्हा सर्वांना माहिती आहे. एका उमेदवाराने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं. दोन्ही पक्ष त्याच्या मागे उमेदवारी घेऊन फिरत आहेत. तरी त्यांनी त्यांची उमेदवारी न घेता दोन्ही पक्षांची मते घेण्याचा प्रयत्न केला असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. तर नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले त्यामुळे विजयासाठी त्यांनी पैठणी आणि पैसे वाटल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
Web Title: Satyajeet Tambe, distribution of bribes and money during election campaign
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App