…..म्हणून सत्यजित तांबे व वडील मतमोजणीच्या ठिकाणी होते गैरहजर
Nashik Graduate Constituency Election, Satyajeet Tambe: सत्यजित तांबे यांचे सहकारी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात, तांबे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे, ते मतमोजणीच्या ठिकाणी न जाता अंत्यसंस्कार करण्यासाठी हजर होते.
नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. दरम्यान, निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.
मागच्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान नाशिक पदवीधर विधानपरिषदेचा आज निकाल लागणार आहे. या दरम्यान सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तील असलेले नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामुळे सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे.
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे.
मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान मानस पगार हे तांबे कुटुंबियांच्या जवळचे असल्याने तांबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील मतमोजणीच्या ठिकाणी न जाता ते अत्यसंस्कार करण्यासाठी हजर झाले आहेत.
Web Title: Satyajeet Tambe and his father were absent at the counting place
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App