संगमनेर तालुक्यात आठवडे बाजारात चोरट्यांची धुलाई
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आठवडे बाजारात पैशाची चोरी करून पळत सुटलेल्या दोन चोरट्यांची नागरिकांनी पकडून बेधुंद धुलाई केली आहे.
साकुर बाजारात साकुर येथील रामभाऊ खेमनर हे बँकेतून पैसे काढून आठवडे बाजारातून जात असताना तीन चोरट्यांनी अचानक त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले. चोरटे पळून जात असताना खेमनर यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी पाठलाग करीत यातील दोघा चोरट्यांना पकडले. यामधील एक चोरटा मात्र पळून गेला. या पकडलेल्या दोघा चोरट्यांची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली.
याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. घारगाव पोलीस साकुर येथे येऊन या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपी गिरिज भगवान भोसले रा. नगर व चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल वायाळ हे करीत आहे.
Web Title: Sangamner Weeks market thieves wash