संगमनेर: अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात, दोन ठार
तळेगाव दिघे | Sangamner: संगमनेर कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघे मार्गावर भागवतवाडी शिवारात अज्ञात वाहनाने एका दुचाकी वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२८) सायंकाळी ५:१० च्या सुमारास घडली.या अपघातात दोघे दुचाकी युवक जागीच ठार झाले.
गोकुळ राजेंद्र माळी (वय २१) व आशुतोष नानासाहेब बोरसे (वय २२) दोघेही रा.लोणी, ता.राहाता अशी मृत युवकांची नावे आहेत. संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने गोकुळ राजेंद्र माळी, आशुतोष नानासाहेब बोरसे हे दोघे युवक दुचाकी वरून (क्र. एमएच १७ सीके ९१७६ ) कोपरगावहून तळेगावच्या मार्गाने जात होते. अज्ञात वाहन टेम्पोने जोराची धडक दिल्याने गोकुळ माळी व आशुतोष बोरसे या युवकांना जबर मार लागून दोघेही जागीच ठार झाले. अपघातास कारणीभूत असणारे अज्ञान वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. त्याचा नंबर काही युवकांनी लिहून घेतला आहे. युवक कार्यकर्ते दिपक भागवत व शरद भागवत यांनी वेळीच मदत केली. घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे पाठविले.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी अपघाताच्या घटनेचा शोध सुरु केला आहे.
Web Title: Sangamner two-wheeler was hit by an unidentified vehicle