Home Accident News संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच ठार

संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच ठार

Sangamner taluka young man on a two-wheeler was killed on the spot in a Accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वरावरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नारायण तात्याभाऊ निर्मळ वय २७ रा. काकडवाडी ता. संगमनेर असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील अज्ञात चालक फरार झाला आहे.

काकडवाडी येथील नारायण तात्याभाऊ निर्मळ हा युवक दुचाकीवरून संगमनेरच्या दिशेने प्रवास करीत होता. या दरम्यान तिगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात जबर मार लागून नारायण निर्मळ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

Web Title: Sangamner taluka young man on a two-wheeler was killed on the spot in a Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here