Home श्रीगोंदा संगमनेर तालुक्यांत या भागांत आढळून आले करोनाबाधित

संगमनेर तालुक्यांत या भागांत आढळून आले करोनाबाधित

Sangamner Taluka various area found Corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात खासगी व  अँटीजेन अहवाल प्राप्त झाल्याने शहरात ९ तर ग्रामीण भागात १७ असे २६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील शासकीय अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. सध्या तालुक्यात ५३७ रुग्ण उपचार घेत असून ९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संगमनेर शहरात इंदिरानगर गल्ली नंबर ८ येथे ३७,६८ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६५ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, मेन रोड येथे ३६ वर्षीय पुरुष, पुणे नाशिक रोड येथे ३३ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे ७० वर्षीय पुरुष, विद्यानगर ७४ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ७८ वर्षीय पुरुष  असे ९ जणांना करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर तालुका ग्रामीण भागात पिंपळगाव देपा येथे ५० वर्षीय पुरुष, २५,५२ वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे ५७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३८,३०,३६,५२ व ६७ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला,  गुंजाळवाडी येथे ३३ वर्षीय महिला,  शिबलापूर येथे ६७ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ५५ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ३८,४१ वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथे ६२ वर्षीय पुरुष, नांदूर खंदरमाळ येथे ३५ वर्षीय पुरुष असे १७ जणांना करोनाची लागण झाली आहे.

Web Title: Sangamner Taluka various area found Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here