संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागांत करोनाची आघाडी सुरूच
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शहरामध्ये करोनाने दिलासा दिला असला तरी ग्रामीण भागांत मात्र आघाडी सुरूच आहे. गुरुवारी 28 बाधित अहवाल प्राप्त झाले यामध्ये शहरातील एक तर ग्रामीण भागात 27 बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 4 हजार 212 इतकी झाली आहे.
गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात अकोले नाका येथे 30 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.
तर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे 48 वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे 33 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 68 वर्षीय महिला, 61 वर्षीय पुरुष, 28,25 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 31 वर्षीय पुरुष, 60, 33, 28,20 वर्षीय महिला 14,9 वर्षीय बालिका, आश्वी खुर्द येथे 42 वर्षीय पुरुष, शेडगाव येथे 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथे 60 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 40 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 70 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, वरुडी पठार येथे 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे 34, 17 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथे 72 वर्षीय महिला, सारोळे पठार येथे 65 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka rural area corona patient roll on